वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी दिल्लीतील निवासस्थान 7 लोक कल्याण मार्ग येथे रक्षाबंधन साजरे केले. या दरम्यान ब्रह्माकुमारी दीदींनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली. याशिवाय लहान मुलींनीही पंतप्रधान मोदींना राखी बांधली. पंतप्रधान मोदींनी शालेय गणवेशात शालेय मुलींसह हृदयस्पर्शी फोटो काढले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवादही साधत विविध गोष्टी शेअर केल्या. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या समारंभामुळे सर्व चिमुकली मुली हर्षोल्हासित झाली होती.
आपल्या निवासस्थानी रक्षाबंधन साजरे करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या. आपल्या संदेशात, त्यांनी भाऊ-बहिणींमधील नाते दृढ करणाऱ्या सणाचे महत्त्व विषद केले. तसेच ‘सर्व देशवासियांना रक्षाबंधनाच्या विशेष प्रसंगी हार्दिक शुभेच्छा.’ असे ट्विट त्यांनी केले.









