पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांनी कर्नाटकातील ( Karnataka ) तुमाकुरू (Tumakuru) येथे भारतातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर उत्पादन उपक्रमाचे उद्घाटन केले. फ्रान्ससोबत राफेल लढाऊ विमान करारावरून काँग्रेस आणि सहकाऱ्यांनी मोदी सरकारवर केलेल्या आरोपांवर पंतप्रधान मोदींनी भाष्य करून कॉंग्रेसवर निशाणा साधला.
कर्नाटकची राजधानी बेंगळूरपासून सुमारे ७० किमी अंतरावर असलेल्या तुमाकुरू येथे एका सभेला संबोधित करताना, विरोधकांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ( HAL ) बद्दल चुकीची माहिती पसरवून संसदेचा मौल्यवान वेळ वाया घालवला असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. “विरोधकांकडून HAL बद्दल चुकीची माहिती पसरवण्यात आली, आमच्या सरकारवर अनेक खोटे आरोप केले गेले. त्यावर संसदेचे अनेक तास वाया गेले. आज उद्घाटन केलेले HAL ची हेलिकॉप्टर तयार करण्याचा प्रकल्प खोटे आरोप करणार्यांचा पर्दाफाश करेल.” असे ते म्हणले.
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले, “कर्नाटक ही नवनिर्माणाची भूमी असून राज्यात ड्रोनपासून तेजस विमानांपर्यंतची निर्मिती केली जात आहे. कर्नाटक राज्य गुंतवणूकदारांची पहिली पसंत बनले आहे. आधुनिक अॅसॉल्ट रायफल, विमानवाहू युद्धनौका, लढाऊ विमाने भारताकडून उत्पादित केली जात आहेत” अशी त्यांनी पुष्टी केली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









