पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर नुकतेच दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच स्वागत केलं. यानंतर मोदींचा ताफा बीकेसीकडे रवाना झाला . आज मुंबईकरांना 38 हजार कोटींच्या विकासकामाचं गिफ्ट मिळणार आहे. मेट्रो2-अ आणि मेट्रो-7 ला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मोदींच्या सभास्थळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलीयं.आज भाषणात मोदी नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या मोदी मुंबई बीकेसीत दाखल झाले आहेत. भाजप आणि शिंदे गटाचे नेते व्यासपीठावर दाखल झाले आहेत. व्यासपीठावर मोदींचे आगमन होताच मानवस्त्र, फेटा, सन्मान चिन्ह, बृहमुंबई महानगरपालिकेकडून मानचिन्ह आणि चाफ्याचा हार घालून पंतप्रधान मोंदीचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल आणि महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते.
फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा
पंतप्रधान मोदी जगातील लोकप्रिय नेते आहेत. मुंबईकरांचे प्रेम मोदींवर आहे. महाराष्ट्र विकासाच्या गतीन धावतोयं. राज्यात डबल इंजिनचं गतिमान सरकार आहे. तेच राज्याचा विकास करणार. 20 वर्षे मुंबईवर राज्य करणाऱ्यांनी केवळ स्वत:ची घरं भरली गेली. पालिकेवर ज्यांनी राज्य केलं त्यांनी केवळ फिक्स डिपॉझीट केली, अस म्हणत उध्दव ठाकरेंवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. भाजपाशी गद्दारी करून 2019 मध्ये मविआचं सरकार आलं असेही ते म्हणाले.
मविआच्या काळात राज्याचा विकास ठप्प झाला- मुख्यमंत्री
मविआच्या काळात किती विकास झाला हे आपल्याला माहित आहेच. मुंबईकरांची सुटका करण्याची संधी आम्हाला मोदींमुळे मिळाली. येत्या दोन वर्षात मुंबईचा कायापालट आपल्याला पाहायला मिळेल. मोदींनी मेट्रोचं भूमिपूजन केलं तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. काहींना मोट्रोचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करायची इच्छा नव्हती. पण नियतीसमोर काहीही चालत नाही. महाराष्ट्राला मोदींकडून खूप अपेक्षा आहेत. हे सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आहे. मविआच्या काळात महाराष्ट्राचा विकास झाला नाही.मोदींमुळे राज्याच्या विकासाची संधी मिळाली. गेल्या अडीच वर्षात काय झालं यावर मी बोलणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









