राज्य किंवा देश यांच्या मुख्यपदी 24 वर्षे केली पूर्ण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक गौरवास्पद विक्रम मंगळवारी केला आहे. राज्य किंवा देश यांच्या प्रमुखपदावर सलग 24 वर्षे राहिलेले ते देशातील आणि कदाचित जगातीलही प्रथम नेते ठरले आहेत. त्यांनी गुजरातच्या नेतेपदाचे उत्तरदायित्व 7 ऑक्टोबर 2001 या दिवशी स्वीकारले. त्यानंतर सलग 13 वर्षे ते या पदावर होते. त्यानंतर 2014 मध्ये ते भारताचे पंतप्रधान म्हणून शपथबद्ध झाले. ते आजही या पदावर आहेत. त्यामुळे राज्य किंवा देश यांच्या प्रमुख नेतेपदी ते सलग 24 वर्षे आहेत. भारतात कोणत्याही नेत्याने हे केलेले नाही. तसेच जगातही असे घडल्याचे उदाहरण नाही, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
हा विक्रम साध्य केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या जनतेचे आभार मानले आहेत. जनतेने सातत्याने पाठिंबा आणि प्रेम दिल्यानेच माझ्या हातून हा विक्रम घडला आहे. जनतेच्या आशीर्वादानेच मी माझ्या सत्ताकाळाची 24 वर्षे पूर्ण केली असून 25 व्या वर्षात पदार्पण केले आहे, अशा भावपूर्ण शब्दांमध्ये त्यांनी त्यांच्या या राजकीय यशाचे संपूर्ण श्रेय जनतेला दिले आहे.
आव्हानात्मक कालावधी
गुजरातच्या नेतेपदी जेव्हा त्यांची निवड करण्यात आली होती, तेव्हा तेथे भारतीय जनता पक्षाची स्थिती नाजूक होती. जरी त्या पक्षाकडे बहुमत असले तरी पक्ष विविध गटांमध्ये विभागलेला होता. तसेच नुकताच गुजरातमध्ये मोठा भूकंप होऊन प्रचंड प्रमाणात जीवीत आणि वित्तहानी झाली होती, अशा अत्यंत अवघड परिस्थितीत त्यांनी गुजरातची सूत्रे हाती घेतली होती. नंतर त्यांनी स्वत:च्या प्रशासकीय कौशल्याने आणि निर्धाराने परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी भूकंपग्रस्त जनतेसाठी अविस्मरणीय कार्य केले. तसेच गुजरातमधील भारतीय जनता पक्षाची स्थितीही सुधारली. पक्षातील गट आणि तट मोडून काढून त्यांनी पक्ष एकसंध केला. यासाठी त्यांना अनेकदा कठोर पावले पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधातही उचलावी लागली होती. तथापि, त्यांनी कर्तव्यकठोरतेचा परिचय देत नैसर्गिक आपत्तीचे आणि पक्षांतर्गत बंडाळीचे अशी दोन्ही आव्हाने एकाचवेळी यशस्वीरित्या पेलली आहेत. आजही त्यांची लोकप्रियता भारतात सर्वाधिक आहे.
तीनवेळा एकहाती विजय
गुजरातचे नेते म्हणून त्यांनी 2002, 2007 आणि 2012 अशा तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळवून दिला. या प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जवळपास दोन तृतियांश बहुमत आणि 50 टक्क्यांच्या आसपास मते मिळवून गुजरातवरील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. गुजरातमध्ये त्यांनी विकासकामांचा धडाका लावला होता. त्यांचे हे कार्य ‘विकासाचें गुजरात मॉडेल’ म्हणून देशभरात प्रसिद्ध झाले आणि आजही आहे.
राष्ट्रीय राजकारणात प्रवेश
त्यांचे प्रशासकीय आणि राजकीय कौशल्य लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना राष्ट्रीय राजकारणात आमंत्रित केले. त्यांना भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेतेपदाचे प्रत्याशी म्हणून घोषित करण्यात आले. त्यांनी 10 महिन्यांच्या काळात झंझावाती प्रचार दौरे करुन सारा देश पिंजून काढला. त्यांच्या या प्रयत्नांचे आणि जनमानसात असलेल्या त्यांच्या प्रतिमेचे फळ भारतीय जनता पक्षाला मिळाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला त्यांनी पूर्ण बहुमताचा विजय मिळवून देण्यात महत्वाचे योगदान केले. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून जगाला परिचित झाले आहेत.
पुन्हा बहुमताचा विजय
2019 च्या लोकसभा निवडणुकतही त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनाता पक्षाने माठा विजय संपादन करत स्वबळावर 303 जागा मिळविल्या. काँग्रेसनंतर भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे, की ज्याने सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये केंद्रात पूर्ण बहुमत मिळविले आहे. 1977 मध्ये प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत स्थापन पेलेल्या जनता पक्षाला त्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाले होते. तथापी तो ‘जनता प्रयोग’ केवळ अडीच वर्षेच चालला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2024 मध्येही भारतीय जनता पक्षाने यश मिळवले असले तरी पूर्ण बहुमताची संख्या पक्ष गाठू शकला नाही. मात्र, राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पूर्ण बहुमताची संख्या पार केल्याने पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांचा हा राजकीय प्रवास देदिप्यमान आहे.
राज्यात अन् देशातही…
गुजरातचे नेते म्हणून…
ड 7 सप्टेंबर 2001 या दिवशी गुजरातच्या नेतेपदी एकमताने निवड
ड 26 मे 2014 पर्यंत गुजरातच्या नेतेपदी, त्यानंतर देशाच्या नेतेपदी
ड गुजरातचे नेते या नात्याने सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये यश
ड गुजरातच्या नेतेपदाच्या काळात विकासाचे ‘गुजरात मॉडेल’ विकसीत
देशाचे नेते म्हणून
ड 26 मे 2014 या दिवशी देशाच्या प्रशासकीय सर्वोच्चपती नियुक्ती
ड 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही पक्षासाठी मिळविला मोठा विजय
ड 2024 निवडणुकीत स्वबळावर पूर्ण बहुमत नाही, राओलाला बहुमत
ड राममंदिर, अनुच्छेद 370, वक्फ सुधारणा, वस्तू-सेवा कर आदी कामे









