वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथबद्ध झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी दौरा आयोजित करण्यात आला आहे. ते 18 जूनला आपल्या या मतदारसंघाला भेट देणार आहेत. त्यांनी या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे. आपल्या दौऱ्यात ते शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत.
त्यांच्या भाषणाचे स्थान अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी विश्वेश्वराच्या मंदिरात प्रार्थना आणि पूजापाठही करणार आहेत. तसेच ते पवित्र गंगानदीच्या दशाश्वघाटावरील गंगा आरती कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. सलग तिसऱ्यांना पंतप्रधान होऊन त्यांनी जवाहरलाल नेहरु यांच्या विक्रमाशी साधर्म्य साधले आहे. 9 जूनला त्यांचा शपथविधी करण्यात आला होता.









