वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अयोध्येतील रामजन्मभूमीच्या स्थानी साकारत असलेल्या भव्य राममंदिरात 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे प्रमुख यजमान असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर व्रताचे पालन करण्यास प्रारंभ केला आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण होईपर्यंत ते केवळ दूध पिऊन राहणार आहेत. तसेच भूमीवर चटई अंथरुन झोप घेणार आहेत. त्यांचे 21 जानेवारीला, अर्थात प्राणप्रतिष्ठेच्या एक दिवस आधी अयोध्येत आगमन होणार आहे. ते प्रतिदिन अयोध्येतील कार्यक्रमांची माहिती घेत आहेत, अशी माहिती मंदिर निर्माण न्यासाकडून देण्यात आली आहे.









