वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘ब्रिक्स’च्या सोळाव्या शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशिया दौरा आयोजित करण्यात आला आहे. ते 22 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबर असे दोन दिवस रशियाला भेट देणार आहेत. 2024 मधील हा त्यांचा दुसरा रशिया दौरा असेल. रशियाच्या कझान शहरात ही शिखर परिषद होणार आहे, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र विभागाने शुक्रवारी दिली आहे.
ब्रिक्स ही आर्थिक सहकार्याला वाहिलेली संघटना आहे. रशियातील शिखर परिषदेत संस्थेच्या सदस्य देशांना आतापर्यंतच्या कार्याचा आणि संघटनेने स्वत:च्या पुढाकाराने प्रारंभ केलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. या शिखर परिषदेचे घोषवाक्य बहुराष्ट्रीयत्वाच्या माध्यमातून जागतिक विकास आणि सुरक्षा’ अशी आहे, अशीही माहिती परराष्ट्र विभागाने दिली आहे.









