सांगली :
जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे उत्तम काम करत असतानाच प्राथमिक शिक्षक दादासो हजारे ट्रेकिंगचा छंद जोपासत आहेत. हजारे यांनी दि.५ ते ११ जून २०२५ या कालावधीत हिमाचल प्रदेश येथील हिमालयातील रोली खोली स्नो ट्रेक ५० कि.मी.ची हिमालयीन टेक ही अवघड समजली जाते. कारण त्याची उंची १३ हजार पाचशे फूट एवढी आहे. त्या उंचीवर ऑक्सिजन लेवल खूप कमी असते. सलग चौथ्यांदा कुमठे ‘ता. तासगाव) येथील टेकर दादासो हजारे यांनी जोखीम घेऊन यशस्वीरित्या पूर्ण केली. हजारे हे जि. प. शाळा मतकुणकी (ता. तासगाव) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
यापूर्वी हजारे यांनी हिमालयातील व्हॅली ऑफ फ्लॉवर, चंदरखानी ट्रेक, तिर्थन व्हॅली जलोरी पास (सायकल ट्रेक), खिरगंगा टेक, बिजली महादेव टेक, पराशर लेक टेक यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. अशा ट्रेकमुळे माणूस निसर्गाशी जोडला जातो. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस स्वतःला विसरून गेला आहे. स्वतःला समजून घेण्यासाठी असे टेक खूप मदत करतात. अशा टेकमध्ये कोणत्याही सुखसुविधा नसतात. मोबाईल ला रेंज नसते, टेन्ट मध्ये राहावे लागते, कठीण मार्ग असतो, पहाड, बर्फ, थंडी, जंगल अशा समस्यांचा सामना करून चालत पुढे जावे लागते.
अशा टेकमुळे काय मिळत असेल असे प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतात. तेव्हा ट्रेकर्स सांगतात की सर्वात जास्त आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा आपण कठीण काम करतो. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्याने आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सुधाण्यासाठी मदत होते. आपण आजकाल गाडीतच फिरतो, त्यामुळे निसर्ग जीवन जवळून पहायला मिळतं नाही. अशा टेकने निसर्गातील वनस्पती, प्राणी यांच्याशी नाते जुळते, प्रेम निर्माण होते. हिमालय सारख्या ठिकाणी हिमालयातील लोक कसे राहतात, त्यांचे काम, खानपान, पोशाख, संस्कृती, सण-उत्सव, त्यांच्या समस्या याविषयी माहिती मिळते. आपल्या फिरण्याने त्यांना रोजगार मिळतो हे पण लक्षात आले. खूप प्रेमळ, समाधानी लोक दिसून आले. ट्रेकिंग करण्यासाठी देशातील विविध राज्यातून, विविध देशातून लोक येतात, त्यांच्या ओळखी होतात. त्यांच्या प्रदेशाविषयी माहिती मिळते, मैत्री होते, ऋणानुबंध निर्माण होतात. आपले स्वतःचे फिटनेस लेवल कळते, आपले स्टेंथ, स्टॅमिना वाढतो, तेथील स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा यामुळे नवीन जीवन मिळत आहे याचा प्रत्यय येतो.








