बेळगाव :
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेलीने रंगोत्सव स्नेहालय स्पर्श या संस्थेत साजरा केला. सहेलीतर्फे स्पर्शमधील मुलांना विविध रंग आणि पिचकारी देण्यात आल्या. रंग खेळण्याचे फुगे, खेळण्यातील बंदुका, पिचकारी यासह येथील मुलांनी रंगाचा मनसोक्त आनंद लुटला. याप्रसंगी युनिट संचालक आरती शहा, अध्यक्ष जिग्ना शहा, अस्मिता जोशी, दीपाली कुरी व गौरी कुलकर्णी उपस्थित होत्या.









