प्रतिनिधी /बेळगाव
एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत 90 टक्क्मयांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समिती, एस. व्ही. कुलकर्णी, स्टुडंट वेल्फेअर, अनंतराव याळगी, कमलाबाई चंदगडकर, पी. एस. कुलकर्णी, अपर्णा चिटणीस, पद्मप्रसाद कुसगुंडी आदी देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यात आली.
100 पैकी 100 गुण मिळविलेला अमोघ कौशिक याच्यासह एकूण 56 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर, दिलीप चिटणीस, अजित कुलकर्णी, एस. वाय. प्रभू, बिंबा नाडकर्णी, अलका कुलकर्णी, ज्ञानेश कलघटगी, पंकज शिवलकर, मर्लीन कोरिया, प्राचार्य सुनील कुसाणे, उपप्राचार्य अरुण पाटील आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे किरण ठाकुर यांनी बेळगाव व भारतातील शिक्षण याबद्दल विवेचन करून अमेरिका, चीन, जर्मनी या देशांतील शिक्षण व नोकरीच्या संधी याबद्दल माहिती दिली. प्रारंभी ईशस्तवन व स्वागतगीत झाले. सूत्रसंचालन वरदा फडके यांनी केले. आदिती पर्वतीकर यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय दिया हणमण्णावर यांनी करून दिला.









