प्रसंगी अतिरिक्त तपासनाके उभारण्यात यावेत : मंत्री हालाप्पा यांची अधिकाऱयांना सक्त सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ातील बेकायदा खाण व्यवसाय व वाळू वाहतूक नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱयांना पुरेसे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकारांचा वापर करून त्यांनी बेकायदा व्यवसाय थोपवावेत, यासाठी अतिरिक्त तपासनाके उभारण्यात यावेत, अशा सूचना खाण आणि भूगर्भ, महिला व बालकल्याण खात्याचे मंत्री हालाप्पा आचार यांनी केल्या.
सुवर्णविधानसौध येथे खाण आणि भूगर्भ, महिला व बालकल्याण खाते, दिव्यांग व ज्ये÷ नागरिक सबलीकरण खात्यांच्या विकास आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सरकारी जमिनीत खाण क्यवसाय सुरू आहे. अशा तक्रारींची तर त्वरित दखल घ्यावी. जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱयांनी पाहणी करून विनाविलंब कारवाई करण्याची सूचना मंत्री हालाप्पा आचार यांनी केली.
वाळू उपसा केंदे निश्चित करून नियमानुसार त्यांचे वाटप करावे. त्यामुळे बेकायदा वाळू वाहतूक थोपविता येणार आहे. याकामी विनाकारण विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱयांविरुद्ध कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱयांना केली. दिरंगाईमुळेच बेकायदा खाण व वाळू क्यवसाय फोफावतो. ते रोखण्यासाठी नियमानुसार वाळू उपसा केंदे निश्चित करण्याचे त्यांनी अधिकाऱयांना सांगितले.
महिला व बालकल्याण विभागातून उद्योगिनी, उद्योग, लघुकर्ज योजना, चेतना योजना, धनश्री आदी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची योग्य अंमलबजावणी झाली आहे. कुपोषण दूर करण्यासाठी गर्भवती, बाळंतीण व मुलांना अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून पौष्टिक अन्न पुरविले जात आहे. 85 टक्के लाभार्थी अंगणवाडी केंद्रात येऊन भोजन करतात. तरीही काही ठिकाणाहून घरीच अन्न पुरविण्याची मागणी केली जात आहे. अशावेळेला अनिवार्य परिस्थिती असेल तरच लाभार्थीच्या घरी अन्नाचे किट पुरविण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱयांना केली.
कोणतेही लाभार्थी योजनांपासून वंचित राहू नयेत. ठोस सर्वेक्षणाच्या माध्यमातून लाभार्थींचा शोध घेऊन त्यांच्या घरापासून अंगणवाडी केंदे दूर असल्यास त्यांना अन्न किट घरपोच द्यावे. अंगणवाडी इमारती उभ्या करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी व जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी जागा उपलब्ध करून द्याव्यात, असेही हालाप्पा आचार यांनी अधिकाऱयांना सांगितले.
यावेळी विधान परिषद सदस्य डॉ. साबण्णा तळवार, चन्नराज हट्टीहोळी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., महिला व बालकल्याण खात्याचे उपसंचालक बसवराज, दिव्यांग कल्याण अधिकारी नामदेव बिलकर आदींसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
दिव्यांग मुलांना लॅपटॉप वितरण करा
जिल्हय़ात 67 हजार 988 दिव्यांग आहेत. यापैकी 44 हजार 598 दिव्यांगांना ओळखपत्रे वितरित करण्यात आली आहेत. उर्वरित 23 हजार 390 जणांना ओळखपत्रे द्यावीत. दिव्यांग मुलांना लॅपटॉप वितरण करावे, अशी सूचना करून दिव्यांग, ज्ये÷ नागरिक सबलीकरण खात्याच्यावतीने दिव्यांग मुलांना लॅपटॉप व टॅब, महिलांना शिलाई मशीन वितरित करण्यात आल्या. महिला व बालकल्याण खात्याच्यावतीने बाळंतिणींना फूड किट वितरित करण्यात आले. तर स्व-साहाय्य गटांना धनादेश वितरण केले.









