तिमाही कामगिरी कमकुवत राहण्याचा अंदाज
मुंबई
रसायन कंपन्यांची डिसेंबर तिमाहीतील कामगिरी कमकुवत राहण्याचा अंदाज आहे. त्यांच्या वित्तीय कामगिरीवर मागील वर्षी काही समस्यांचा प्रभाव पडला असून यात पुरवठा संबंधित आव्हाने, कच्च्या मालाच्या उपलब्धतेशी निगडित समस्या, वीज आणि मालवाहतुकीचा अधिक खर्च इत्यादींचा समावेश आहे.
डाय, पिगमेंट, ऑटोमोटिव्ह, फ्लेवर्स अँड प्रँगरेन्स तसेच पॉलिमर यासारख्या डिस्क्रेशनरी वापराशी निगडित कंपन्यांना अल्पावधीत अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. नव्या क्षमता सुरू होणे आणि सुधारात अंतर दिसून येऊ शकतो असे आयआयएफएल सिक्योरिटीजचे रंजीत सिरुमलिया यांचे म्हणणे आहे. कृषी रसायन आणि फार्मास्युटिकल आधारित व्हॅल्यू चेनची स्थिती मजबूत राहणार असल्याचे विश्लेषकांचे मानणे आहे. धोरणात्मक खर्च अंमलबजावणीतील अंतर आणि उत्पन्नाशी निगडित जोखीम पाहता आयआयएफएलने दोन कंपन्यांसाठीचे स्वतःचे मानांकन घटविले आहे.
वीज तसेच मालवाहतुकीचा खर्च काही प्रमाणात घटला तरीही या कंपन्यांवरील दबाव कमी झालेला नाही, कारण कंपन्या वाढत्या उत्पादन खर्चाचा पूर्ण भार ग्राहकांवर टाकण्यास सक्षम राहिलेल्या नाहीत. मालवाहतुकीच्या दरातील नरमाईचा लाभ निर्यातदारांना मिळणार असल्याने त्यांना नफ्यावर पडणारा प्रभाव कमी करता येणार असल्याचे आयआयएफएलचे मानणे आहे.









