प्रतिनिधी /बेंगळूर
पोलीस दलात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल राज्यातील 20 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपतीपदक जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवा पदक आणि आणि 18 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. कर्नाटक राज्य राखीव पोलीस विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सीमंतकुमार सिंग आणि कम्युनिकेशन, लॉजिस्टिक्स आणि आधुनिकिकरण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. मुरुगन यांना विशिष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. मंगळवारी स्वातंत्र्यदिनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे केएसआरपीचे आयजीपी संदीप पाटील, बेंगळूरच्या सीआयडीचे पोलीस अधीक्षक राघवेंद्र के. हेगडे, बेंगळूर जिल्हा पोलीस मुख्यालयातील डीवायएसपी बी. एस. मोहनकुमार, बेंगळूर व्ही. व्ही. पूरम पोलीस स्थानकाचे एसीपी बी. नागराज, म्हैसूरमधील पोलीस अकादमीचे साहाय्यक संचालक एम. शिवशंकर, बेंगळूर सीआयडीचे डीवायएसपी जी. केशवमूर्ती, एम. एन. नागराज, अंजुमाल टी. नायक आणि बी. एन. श्रीनिवास यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपतीपदक जाहीर झाले आहे. कर्नाटक लोकायुक्तचे डीवाएसपी बी. गिरीश, बेंगळूरच्या सदाशिवनगर वाहतूक पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आर. पी. अशोक, बेंगळूर केंद्रीय गुन्हे शाखेचे (सीसीबी) पोलीस निरीक्षक अनिलकुमार पी. ग्रामपुराहीत, रामनगर जिल्हा तावरेकेरेचे पोलीस निरीक्षक रामप्पा बी. गुत्तेर, केएसआरपीचे विशेष एआयआरएस व्ही. बंगारू, उडुपी जिल्हा सशस्त्र राखीव पोलीस दलाचे शंकर, रायचूर येथील एएचसी वेंकटेश के. आणि बेंगळूर स्टेट क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे एएचसी श्रीकुमार एस. यांना देखील उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.









