कोल्हापूर
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व कळंबा कारागृहाचे अधीक्षक विवेक झेंडे या दोघांना सेवेत उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मानाचे राष्ट्रपदी पदक जाहीर झाले आहे.
सुनील फुलारी यांचे शिक्षण एमएससी, एमबीए असून, त्यांनी सायबर क्राईमचा डिप्लोमा केला आहे. त्यांनी चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव या ठिकाणी सेवा बजावली आहे. १९९७ साली त्यांनी नागपूर क्राईम ब्रॅचला पोलीस अधीक्षक पदापासून कामकाजाला सुरूवात केली होती. त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून गेल्या दोन वर्षापासून सुनिल फुलारी हे काम पहात आहेत. त्यांना २०१३ साली पहिल्यांदा राष्ट्रपती पदक मिळाले होते. त्यानंतर त्यांना शनिवारी (सन २०२५) दुसऱ्यादा राष्ट्रपती पदक मिळाले आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानीत करण्यात आले आहे.
गडचिरोली, चंद्रपूर, नक्षलवादी क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केली. नागपूर शहरात मोका व एमपीडीए कायद्याची प्रभारी अंमलबजावणी करून गुह्यात घट केली. कोरोना काळात कडक अंमलबजावणी करून मानवतेची सेवा केली. कोल्हापूर, सातारा, मिरज, विशाळगड येथील जातीय हिंसाचार ,मराठा आरक्षणविषयक आंदोलने या दरम्यान समाजामध्ये तणावाची परिस्थिती उद्भवतली असताना, जातीय सलोखा राखून सामाजिक शांतता राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना सातत्याने राबवून समाजामध्ये सलोखा निर्माण केला होता.
लोकसभा व विधानसभा निवडणूका हिंसाचारमुक्त केल्या. काटेकोरपणे निवडणूकीच्या आचारसंहितेची अंबलबजावणी केली. कोल्हापूर परिक्षेत्राला कर्नाटक आंतरराज्य सीमा आहे. दोन्ही राज्यांतील पोलीस दलात समन्वय ठेवून, अघटीत घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेतली. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे (ग्रामीण), सोलापूर (ग्रामीण) जिह्यात नवीन पोलीस ठाणी, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकरीता निवासी इमारतीची उभारणी, पोलीसांसाठी कल्याणकारी योजना, मानसिक ताण तणाव कमी करण्याबाबत उपाय, कौशल्यपूर्ण कामकाज प्रशिक्षण देणे, यासाठी फुलारी यांनी काम केले आहे. त्यांच्या याच कामाची पोहचपावती म्हणून, केंद्र सरकारने त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपदी पदकाने सन्मानीत केले आहे.
कळंबा कारागृहाचे अधीक्षक विवेक वसंत झेंडे हे २००२ पासून तुरुंगाधिकारी श्रेणी दोन या पदावर नियुक्त झाले. त्यांनी आतापर्यंत कळंबा (कोल्हापूर), आर्थर रोड (मुंबई), अमरावती, सातारा, तळोजा (नवी मुंबई), नाशिक, सांगली या जिह्यातील कारागृहामध्ये तुरुंगाधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. सध्या ते अधीक्षक म्हणून कळंबा कारागृहात सेवा बजावत आहेत. कारागृहात उत्कृष्ठ सेवा बजावल्याबद्दल त्यांना अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा सन्मानचिन्ह २०२३ मध्ये मिळाले आहे. त्यांच्या याच कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती पदकाने त्यांना सन्मानित केले आहे.
Previous Articleवैद्यकीय महाविद्यालयाची कामे गुणवत्तापूर्ण करा
Next Article नळ पाणी योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्प राबवा








