महाराष्ट्रात एकीकडे ठाकरेसेना की शिंदेसेना या प्रश्नाभोवती राजकारण गुंडाळले असतानाच दुसरीकडे औरंगाबादच्या तरुणाने मात्र चक्क राष्ट्रपती निवडणुकीसाठी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे जाऊन उमेदवारी अर्ज भरला आहे. त्याने याची पावती सोशल मिडियावर शेअर केली आहे. राष्ट्रपती निवडणूक अर्जाची पावती शेअर करताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. औरंगाबाद शहरातील सामाजिक कार्यकर्ता विशाल उद्धव नांदरकर असे याचे नावं आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार अर्ज भरत असल्याची माहिती या तरुणाने समाजमाध्यमावर दिली.
हेही वाचा- माझी बांधिलकी शिरोळच्या जनतेशी- मंत्री यड्रावकर
विशाल नांदरकर हा औरंगाबाद शहरातील सिडको परिसरातील रहिवासी आहे. तो सामाजिक कामात सक्रीय असतो. मात्र, आज (२५ जून) त्याने दिल्ली गाठत राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला. शिवसेनेतील बंडखोरीचा विषय देशभरात चर्चेत असतानाच औरंगाबादच्या या तरुणाचा निर्णय देखील आता लक्ष वेधून घेत आहे. या तरुणाला देशातील अपक्ष लोकप्रतिनिधींकडून पाठिंब्याची अपेक्षा आहे. त्याने या सर्वांना मतदान करण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा- दिपक केसरकरांच्या पत्रकार परिषदेतील १० मुद्दे; जाणून घ्या एका क्लिकवर
एका खासगी वाहिनीशी बोलताना विशाल नांदरकर म्हणाले, मी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. देशभरातील सर्व खासदार आणि आमदार यांनी राष्ट्रपती निवडणुकीत मला मतदान करावं, अशी मी विनंती करतो. देशातील सर्व अपक्ष खासदार, आमदारांनी मला पहिल्या पसंतीचं मत द्यावं आणि विजयी करावं अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









