नवी दिल्ली : राज्यात राज्यसभा विधानपरिषद निवडणूकीची धामधूम सुरु असतानाच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदासाठीचा (President) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar)यांनी दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा आज केली.
मविआचं संपर्क करण्याचं धाडस नाही-विनय कोरे
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. त्यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नवनिर्वाचित राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतील. दरम्यान १५ जून रोजी या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. त्यानुसार १८ जुलै रोजी मतदान होईल व २१ जुलै रोजी दिल्लीत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी विधानसभा व लोकसभा-राज्यसभेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधीचे या निवडणुकीत मतदान करू शकतात.