कुर येथे कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्यासाठी विशेष शिबीर
शिबीरास उदंड प्रतिसाद
गारगोटी प्रतिनिधी
आमदार प्रकाश आबीटकर व मी विधीमंडळात गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न शील असुन त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद असुन गिरणी कामगारांना घरे मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असे प्रतिपादन गिरणी कामगार सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनिल राणे यांनी केले.
कुर ता. भुदरगड येथे कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन श्री राम मंगल कार्यालयात करण्यात आले होते त्याप्रसंगी बोलत होते यावेळी आमदार प्रकाश आबीटकर, जेष्ठ कामगार नेते अतुल दिघे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बी एस देसाई होते.
पहा VIDEO >>> कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीसाठी मेळावा
आमदार सुनील राणे म्हणाले की,आपण येथे काही राजकारणातुन आलेलो नाही केवळ हदयातुन गिरणी कामगारांच्या साठी काही तरी करण्याची तळमळ मनामधून घेवुन आले आहोत मुंबई च्या जडणघडणीत गिरणी कामगारांचे मोठे योगदान आहे त्यांच्या वारसांना हक्काची घरे मिळवून देणार.
आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले की, मुंबईत गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी आम्ही विधीमंडळात सातत्याने प्रश्न उपस्थित करत असुन त्याला यश ही येत आहे जिल्ह्यातील बहुतांश गिरणी कामगार मुंबई ला होते आमच्या मागणी नंतर शासनाने सहनियंत्रण समिती स्थापीत केली असुन कामगारांना घरे देण्याचे एक वेगळे समाधान आम्हाला लाभेल.
जेष्ठ कामगार नेते अतुल दिघे म्हणाले,गिरणी कामगारांनी मुंबई सोन्याची घडविली आहे मुंबईत १८००एकर जमीन गिरणी ची असुन केवळ १०टक्के आरक्षीत जागा केल्यास सर्वांना घरे मिळतील. यावेळी बबन शिंदे, कृष्णात चौगले, गोपाळ गावडे यांच्या हस्ते आमदार राणे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य,प्राचार्य अर्जुन आबीटकर, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, कल्याण निकम, आय सी टी कंपनीच्या गीतांजली कांबळे, अरुण जाधव,माजी उपसभापती अजित देसाई,माजी सभापती आक्काताई नलवडे, सुनिल सुरेरा आदी प्रमुख उपस्थित होते.सुत्रसंचलन जितेंद्र निर्मळे यांनी केले









