राष्ट्रपतीपदीसाठी द्रौपदी मुर्मूं या प्रचंड मतांनी विजयी झाल्या आहेत. पहिल्याच फेरीत त्यांना ५४० मतं मिळाली. पहिली फेरी पूर्ण होताचं भाजपाकडून देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. देशातील पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर निवडून आल्यानं सर्वंच ठिकाणाहून आनंद वर्षाव होत आहे. आधीवासी पाड्यावर देखील मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव सुरु झाला आहे. तर आमदारांच्या मतमोजणीनंतर सुरुवात झाली आहे. फक्त अधीकृत घोषणा होणे बाकीचे आहे.
राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान झाल्यानंतर आज गुरुवारी (ता. 21) जुलै रोजी सकाळी 11 वाजता संसद भवनात मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षातर्फे यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) हे दोन उमेदवार रिंगणात आहेत. 15 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी प्रतिभाताई पाटील यांच्या रूपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणूकीतही महिलाचं उमेदवार असल्याने निकालाकाडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचं पारडं आधीचं जडं होत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी २०० आमदार मतदान करतील अस भाकित केलं होत. ते आता खरं होणार की नाही हे निकावावरुन स्पष्ट होईल. पहिल्याच फेरीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना५४० मतं मिळाली आहेत. तर विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना अवघे २०८ मतं मिळाली आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत १५ खासदारांची मतं अमान्य ठरली आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









