नवी दिल्ली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवार, 14 ऑगस्ट रोजी 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करणार असल्याचे राष्ट्रपती भवनाने रविवारी एका निवेदनात सांगितले. त्यांचे संबोधन सोमवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून ऑल इंडिया रेडिओच्या संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्कवर प्रसारित केले जाईल. तसेच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर पहिल्यांदा हिंदी आणि नंतर इंग्रजीमध्ये ते प्रसारित केले जाईल. ऑल इंडिया रेडिओ आपल्या संबंधित प्रादेशिक नेटवर्कवर रात्री 9.30 वाजता प्रादेशिक भाषांमधून भाषण जारी करणार आहे.









