नैनीताल :
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वत:च्या उत्तराखंड दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी नैनीताल येथील प्रसिद्ध कैंची धाममध्ये नीम करौरी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर राष्ट्रपतींनी कुमाऊं विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात त्यांनी भाग घेतला. या सोहळ्याला संबोधित करताना राष्ट्रपतींनी उत्तराखंडला शतकांपासून ज्ञान आणि संस्कृतीचे केंद्र संबोधिले आहे. राष्ट्रपतींनी उत्तराखंडच्या भूमीला वीरांची भूमी संबोधत नमन केले. उत्तराखंडच्या भूमीतील स्वातंत्र्यसेनानींनी संघर्ष केला आणि देशभूमीच्या लोकांनी देशाच्या रक्षणात महत्त्वाचे योगदान दिले असल्याचे उद्गार त्यांनी काढले. तर दीक्षांत सोहळयात पदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रपतींनी अभिनंदन केले आहे. राष्ट्रपतींनी राजभवन नैनीतालच्या मुख्य द्वाराचा शिलान्यास केला आहे. ऐतिहासिक राजभवन स्थापनेला 125 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आायेजित कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपतींनी या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धन आणि संरक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.









