मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी केले स्वागत
वृत्तसंस्था/ बद्रीनाथ
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सध्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. मुर्मू यांनी बुधवारी बद्रीनाथ येथे जात दर्शन घेतले आहे. मंदिरात सुमारे 25 मिनिटांपर्यंत पूजा करत राष्ट्रपतींनी देशात सुखसमृद्धी नांदो अशी प्रार्थना केली आहे. बद्रीनाथ येथे उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंह आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले.
बद्रीनाथचे मुख्य पुजारी रावल ईश्वर प्रसाद नंबूदरी तसेच तीर्थ पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारात विधिवत पूजा केली आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय, उपाध्यक्ष किशोर पवार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना बद्री विशालचा प्रसाद तसेच पवित्र वस्त्र प्रदान केले आहे. तर मुख्यमंत्री धामी यांनी यावेळी राष्ट्रपतींना बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती भेट केली आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याकरता बद्रीनाथ धाम येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









