President in Sukhoi: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेजपूर हवाई अड्ड्यावरुन सुखोई-३० MKI लढाऊ विमानाने उड्डाण केलं. आसामच्या दौऱ्यावर असताना तेजपूर एअर फोर्स स्टेशनवरून त्यांनीं उड्डाण केलं. डॉ.एपीजे अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील आणि रामनाथ कोविंद यांनंतर हवाई दलाच्या लढाऊ विमानातून उड्डाण करण्याऱ्या राष्ट्रपतींमध्ये त्यांची नोंद झालीय.
वायुदल पायलटच्या वेशामध्ये द्रौपदी मुर्मू यांनी हिमाचल प्रदेशाकडे उड्डाण केलं.भारतीय त्रिदलाच्या प्रमुख या नात्यानं त्यांना यावेळी गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं. तसेच सैन्याची शक्ती, शस्त्र आणि धोरणांची देखील माहिती देण्यात आली.
आसामच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात फ्रिडा येथे ‘गज उत्सवा’चे उद्घाटन केलं. तसेच आसाममध्ये आयोजित विविध कार्यक्रमांना देखील त्या उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांनी आज तेजपूर हवाई अड्ड्यावरुन सुखोई 30 MKI या लढाऊ विमानानं उड्डाण केलं आहे.