तीन दिवस विविध कार्यक्रम : कडक सुरक्षा व्यवस्था तैनात
पणजी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांसाठी गोव्यात येत आहेत. त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आज मंगळवार 22 रोजी दुपारी दाबोळी विमानतळावर राष्ट्रपतींचे आगमन होईल. त्यांना मानवंदना दिल्यानंतर त्या राजधानी पणजीकडे रवाना होतील. सायंकाळी साडेचार वाजता पणजीतील हुतात्मा स्मारकावर आदरांजली वाहिल्यानंतर त्या दोनापावला येथील राजभवनावर रवाना होतील. संध्याकाळी साडेसहा वाजता विविध कार्यक्रमांना सुरवात होईल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येईल. त्यानंतर राज्यपालांचे भाषण होईल. राष्ट्रपतींचे मार्गदर्शन झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल. बुधवारी 23 रोजी सकाळी साडेदहा वाजता गोवा विद्यापीठाचा 34 वा पदवीदान समारंभाला होईल. यावेळी राष्ट्रपती पदवीदान समारंभाचे अभिभाषण करतील. गुऊवारी 24 रोजी राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांना राष्ट्रपती मुर्मू भेटी देणार आहेत.









