‘स्वस्ति अस्तु विश्वस्य’ : युक्रेन युद्धादरम्यान वैश्विक शांततेच्या प्रार्थनेसह जी-20 बैठकीचा समारोप
उपासमारीविरुद्ध लढण्याची ब्राझीलची घोषणा, युएनएससीच्या विस्ताराची भारताची मागणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वस्ति अस्तु विश्वस्य’ या संदेशाने रविवारी जी-20 शिखर परिषदेचा समारोप केला. शिखर परिषदेच्या समारोपाच्या वेळी त्यांनी ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्याकडे जी-20 च्या अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली. ‘जगात शांतता नांदावी’ असा संदेश भारताने दिला असून शिखर परिषदेतील ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जाते. तसेच पंतप्रधान मोदींनी नवीन जागतिक रचनेत जगाचे नवीन वास्तव प्रतिबिंबित करण्याचे आवाहन करतानाच संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याची मागणीही केली.

युक्रेनच्या मुद्द्यावर झालेल्या करारावर जी-20 प्रतिनिधींमध्ये संघर्ष असूनही जी-20 नेते शिखर परिषदेत एकवटल्यानंतर ‘100 टक्के सहमती’ने भारताचे घोषणापत्र स्विकारण्यात आले. त्यानंतर समारोपप्रसंगी ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’चा रोडमॅप आनंददायक असेल. धन्यवाद!’ असे म्हणत मोदींनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जी-20 गटाचे अध्यक्षपद ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्याकडे सोपवले. यावेळी त्यांनी सिल्वाला यांच्याकडे पारंपरिक गिव्हल (हातोड्याचा एक प्रकार) सुपूर्द केला. तथापि, नोव्हेंबर 2023 पर्यंत जी-20 च्या अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडेच राहणार असून 1 डिसेंबर 2023 पासून अध्यक्षपदाची सूत्रे ब्राझीलकडे जातील.
समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. जग बदलत असताना जगातील मोठ्या आणि जबाबदार संस्थांनाही बदलण्याची गरज आहे. ‘युएनएससी’मध्ये अजूनही तितकेच सदस्य असून त्याचा विस्तार झाला पाहिजे, म्हणजेच कायम देशांची संख्या वाढली पाहिजे, अशी अपेक्षा मोदींनी भारताच्यावतीने व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनी 2024 मध्ये ब्राझीलच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे अभिनंदन केले.
नोव्हेंबरमध्ये व्हर्च्युअल सत्र होणार
नुकत्याच पार पडलेल्या शिखर परिषदेत गेल्या दोन दिवसात सर्वच देशांनी अनेक सूचना आणि प्रस्ताव दिले. त्यांची प्रगती कशी गतिमान करता येईल हे पाहण्यासाठी सूचनांचे पुन्हा एकदा पुनरावलोकन करणे हे अध्यक्ष या नात्याने भारताचे कर्तव्य आहे. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आम्ही जी-20 चे व्हर्च्युअल (आभासी) सत्र आयोजित करण्याचा माझा प्रस्ताव आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नोव्हेंबरमधील व्हर्च्युअल बैठकीमध्ये ठरलेल्या विषयांचे आम्ही पुनरावलोकन करू शकतो. सर्व सदस्यराष्ट्रांनी आभासी सत्रात सामील व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत दोन दिवसीय जी-20 सत्र संपल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले.
ब्राझीलने केले भारताचे कौतुक
ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांनी उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना स्वारस्य असलेल्या मुद्द्यांवर आवाज बुलंद केल्याबद्दल भारताचे कौतुक केले. ब्राझील यावषी 1 डिसेंबर रोजी अधिकृतपणे जी-20 गटाचे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. गरीब देशांच्या कर्जाच्या समस्येकडे लक्ष द्यावे लागेल असे सुचवितानाच उपासमारीची समस्या संपवण्यासाठी जगाला प्रयत्न वाढवावे लागतील, असे प्रतिपादन ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी केले. सामाजिक समावेश, उपासमारीविऊद्ध लढा, ऊर्जा संक्रमण आणि शाश्वत विकास यांना जी-20 प्राधान्यक्रम म्हणून ब्राझीलने सूचीबद्ध केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला आपली राजकीय ताकद टिकवून ठेवण्यासाठी नवीन विकसनशील देशांची कायमस्वरूपी आणि स्थायी सदस्य म्हणून गरज आहे. आम्हाला जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये विकसनशील देशांचे अधिक प्रतिनिधित्व आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जी-20 च्या तिसऱ्या सत्रात ‘वन फ्युचर’
जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी जी-20 गटाचे कार्यक्षमतेने नेतृत्व केल्याबद्दल आणि या शिखर परिषदेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. जागतिक समता प्रस्थापित करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. तत्पूर्वी, एका प्रतिकात्मक समारंभात इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो आणि ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी रविवारी विद्यमान राष्ट्राध्यक्षांना प्रत्येकी एक रोप भेटीदाखल दिले. जी-20 शिखर परिषदेच्या ‘वन फ्युचर’च्या तिसऱ्या सत्राच्या सुऊवातीला हा सोहळा झाला. जी-20 शिखर परिषदेच्या ‘वन फ्युचर’ सत्राला संबोधित करताना, मोदींनी संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संस्थांमध्ये सुधारणांच्या गरजेवर भर दिला आणि ‘नवीन जागतिक फ्रेमवर्क’मध्ये जगाची ‘नवीन वास्तविकता’ प्रतिबिंबित करण्याचे आवाहन केले.
► ब्रिटन, रशिया आणि अमेरिकेसह सर्वच देशांनी भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या नीट-नेटक्या आयोजनाबद्दल कौतुक केले.
► ब्रिटन पंतप्रधान ऋषी सुनक यांनी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांच्याकडे ब्रिटिश लोकशाहीतील चीनच्या हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित केला.
► तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल सिसी यांच्याशी द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.
► दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांनी युक्रेनला 2 अब्ज डॉलर्सची मदत देणार असल्याचे करार-चर्चेअंती जाहीर पेले.
► युक्रेनमधून रशियन सैन्य पूर्णपणे माघार घेण्याची मागणी करत जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका









