वडूज :
खटाव तालुक्यातील तडवळे येथील ओगलेवाडी स्थित दिवंगत उद्योजक स्व.वसंतराव खाडे यांचा स्मृतीदिन साजरा झाला. या निमित्ताने भजन कीर्तन आदि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.त्याच बरोबर दहिवडी– मायणी रस्त्याला जोडण्राया खाडे वस्ती पोहोच रस्त्यावर उभारलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
ह.भ.प.गणेश डांगे म्हणाले जगात पैसा सर्वश्रेष्ठ नाही. पैशाबरोबर माणुसकी जपली पाहिजे. माणसाने आपण ज्या परिस्थितीतून गेलो त्याची कायम जाणीव ठेवावी.जनमाला आलेल्या प्रत्येकाला मरन आहे. पण चांगले कर्म करीत समाजाच्या उपयोगी यावे. गाव, समाजासाठी उपयोगी येणारी माणस दीर्घकाळ स्मरणार्थ राहतात. घरातील कर्ता बापमाणूस आयुष्यातून निघून जाण्याचे मोठे दु?खअसते.गेलेल्या मोठ्या माणसांच्या संस्काराने कार्यरत राहणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरते.
भाजपा नेते सदाभाऊ खाडे , विकास साबळे, पालवे पाटील सर यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.कार्यक्रमास माजी समाज कल्याण सभापती मानसिंगराव माळवे, प्रा. सदाशिव खाडे, राजुभाई मुलाणी, धनंजय क्षीरसागर, मा.ए.खाडे, दुय्यम निबंधक धनाजीराव खाडे, ह. भ.प. प.ना.लोहार,संजय खाडे, पांडुरंग खाडे , सुदाम खाडे, डॉ. सागर खाडे, डॉ . चंद्रकांत खाडे, ऍड. सुनिल गंबरे,विनायक खाडे, अरुण खाडे,भास्कर खाडे, प्रमोद खाडे, शरद पाटील,गोपीनाथ खाडे, आनंदराव ओंबासे, नानासाहेब खाडे पाटील,गणपत खाडे,सुनिल खाडे, रंगराव पवार,छगन शिंदे आदि उपस्थित होते.
युवा उद्योजक प्रतिक खाडे यांनी स्वागत केले.








