कोल्हापूर :
श्री जोतिबा मूर्ती संवर्धन करताना मूळ रूपात म्हणजेच 1937 मध्ये जसे मूर्तीचे स्वरूप होते तसेच संवर्धन करा, अशी मागणी प्रजासत्ताक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे ‘ई’ मेलद्वारे निवेदनाने केली आहे.
यामध्ये म्हटले आहे. श्री जोतिबा मंदिरातील मूर्तीचे 1982 व 2006 मध्ये जे संवर्धन केले. ते पूर्णपणे मूर्तीचे मूळ रूप बदल केलेला आहे. मूर्तीचे रूपामध्ये बदल करून विटंबना केलेले आहे. किंबहुना छेडछाड केली आहे. तरी 1937 मध्ये जोतिबाची मूर्ती ज्या स्वरूपात होती. त्या स्वरूपात सध्या सुरू असणारे संवर्धनामध्ये होणे आवश्यक आहे. देवाच्या मूर्तीची विटंबना अथवा रूपात बदल होता कामा नये, याची पूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे अध्यक्ष म्हणून घ्यावी. या निवेदनासोबत देसाई यांनी 1937 सह 1982 त्यानंतर 2006 मध्ये संवर्धन करण्यात आलेले फोटो सोबत जोडले आहेत.








