कार्तिक-कियाराची जोडी चाहत्यांना पसंत
कार्तिक आर्यन अन् कियारा अडवाणी यांचा चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. समीर विध्वंस दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिक हा सत्यप्रेम नावाच्या एका गुजराती युवकाची भूमिका साकारत आहे, या युवकाला लवकरात लवकर विवाह करायचा असतो. तर कियारा ही कथा या युवतीची भूमिका साकारत आहे. ही म्युझिक लव्ह स्टोरी 29 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचा ट्रेलर ड्रामा, रोमान्स, इमोशन्स आणि संगीताने भरपूर आहे. ट्रेलरला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट साजिद नाडियावालाकडून निर्माण करण्यात आला आहे. यात कार्तिक, कियारा यांच्यासोबत गजराज राव, सुप्रिया पाठक आणि राजपाल यादव यासारखे कलाकार दिसून येणार आहेत. कार्तिक आणि कियारा यापूर्वी ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटात एकत्र दिसून आले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते.









