डिस्नेकडून चित्रपटाची निर्मिती
डिस्नेने स्वत:चा आगामी चित्रपट ‘हॉन्टेड मॅन्शन’चा ट्रेलर जारी केला आहे. या हॉरर कॉमेडी धाटणीच्या चित्रपटात अनेक भीतीदायक दृश्यं असल्याने प्रेक्षकांना जपून राहण्याचा सल्ला निर्मात्यांकडून देण्यात आला आहे.
ट्रेलरमध्ये अनेक भीतीदायक दृश्यांना स्थान देण्यात आले आहे. याचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर आता लोकांच्या प्रतिक्रियाही मिळू लागल्या आहेत. हॉन्टेड मॅन्शन या चित्रपटाबद्दलची उत्सुकता या ट्रेलरमुळे वाढली आहे. जस्टिन सिमियन यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटात लॅकीथ स्टॅनफील्ड, टिफनी हॅडिश, ओवेन विल्सन, डॅनी डेविटो, रोसारियो डावसन, चेस डब्ल्यू डिलन, आणि डॅनियल लेवी यासारखे कलाकार दिसून येणार आहेत. तसेच जेमी ली कर्टिस आणि जेरेड लेटो द हॅटबॉक्स घोस्टच्या स्वरुपात दिसून येईल.
क्लासिक थीम पार्क अट्रॅक्शनने प्रेरित हॉन्टेड मॅन्शमध्ये एक महिला आणि तिच्या मुलाची कहाणी दाखविण्यात आली आहे. स्वत:च्या घराला अपारलौकिक शक्तींपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी तथाकति अध्यात्मिक तज्ञांकडून मदत घेतली जात असल्याचे यात दर्शविण्यात आले आहे. डॅन लिन आणि जोनाथान एरिच या चित्रपटाचे निर्माते आहेत.









