कार्तिक अन् कियाराचा चित्रपट
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या स्वत:चा आगामी चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’मुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचा टीझर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आला होता. आता निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर सादर केले आहे. या पोस्टरमध्ये कियारा आणि कार्तिक यांचा रोमँटिक अंदाज दिसून येत आहे.
या चित्रपटाचे चित्रिकरण काश्मीर खोऱ्यामध्ये पार पडले आहे. पोस्टरमधील दृश्य काश्मीरमधील असल्याचे समजते. ‘सत्तू आणि कथेच्या शुद्ध प्रेमाने कोट्यावधी हृदयात स्थान मिळविले आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी धन्यवाद’ असे निर्मात्यांनी पोस्टर शेअर करत म्हटले आहे. या रोमँटिक पोस्टरवर युजर्स प्रेमाचा वर्षाव करत आहे.
नमह पिक्चर्ससोबत साजिद नाडियाडवालाच्या बॅनर अंतर्गत निर्मित हा चित्रपट यंदाचा सर्वात चर्चेत राहणारा चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटाचे नाव पूर्वी ‘सत्यनारायण की कथा’ ठेवण्यात आले होते. परंतु नावामुळे वाद उभा ठाकल्याने यात बदल करण्यात आला होता. हा चित्रपट 29 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात कार्तिक, कियारा यांच्यासोबत गजराव राव आणि सुप्रिया पाठक हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. कियारा आणि कार्तिक यांची जोडी यापूर्वी ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटात दिसून आली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.









