प्रतिनिधी/ बेळगाव
बुलकच्या बैठकीमध्ये कवि चंद्रशेखर गायकवाड यांनी ‘श्वासात शब्द बांधताना’ हा कार्यक्रम सादर केला. कवि अशोक अलगोंडी यांनी त्यांची मुलाखत घेतली. गायकवाड यांचा ‘कळा या लागल्या जीवा’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.
त्यांनी ‘दारात काळजांच्या रांगोळी घालतो मी, रोपट्यास पाणी माझ्या रक्ताचे घालतो मी’ आणि वादळ, त्सुनामी, बॉक्स नव्हे इडियट यासह अनेक कविता सादर केल्या. अशोक अलगोंडी यांनीसुद्धा गायकवाड यांच्या कविता सादर केल्या. किशोर काकडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.









