Dhokla Recipe : सुट्टीच्या दिवशी घरी नाष्टा काय बनवावा असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यातच नेहमी तेच तेच पदार्थ करायला आणि खायला देखील कंटाळा येतो. अशावेळी वेगळ काहीतरी ट्राय करावं अस प्रत्येकीला वाटतं असतं. आज आम्ही तुम्हाला हॉटेल किंवा बेकरीत मिळणारा मऊ आणि खमंग असा ढोकळा घरच्या घरी कसा बनवावा याची रेसीपी सांगणार आहोत. बरेचदा आपण ढोकळा करतो पण तो बिघडतो.पण काळजी करू नका. ढोकळा तयार करताना छोट्या-छोट्या ट्रिक्स वापरून तो स्पंजी कसा बनवावा याच्या टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला चर मग ढोकळा कसा बनवावा हे जाणून घेऊया.
साहित्य
बेसन पीठ- दीड कप
साखर- 4 चमचे ( मध्यम आकाराचा पोहा चमचा )
सायट्रिक अॅसिड- 1 चमचा
पाणी-आवश्यकतेनुसार
तेल-8 चमचे
मीठ- 1 चमचा
खाण्याचा सोडा- एक चमचा
कृती
सुरुवातीला साखर, मीठ, सायट्रिक अॅसिड मिक्सरमधून बारीक करून घ्या. यानंतर एका बाऊलमध्ये हे मिश्रण घेऊन यात 8 चमचे तेल घाला. हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. यानंतर यात दीड कप बेसन चाळून घालून मिक्स करून घ्या. आता थोडे-थोडे पाणी घालून एकसारखे पीठ तयार करून घ्या. पीठ फार पातळ किंवा घट्ट बनवू नका. यानंतर हे पीठ 30 ते 40 मिनिटे तसेच मुरण्यासाठी झाकून ठेवा. यानंतर फोडणी करून घ्या.
फोडणी तयार करताना वापरा ही ट्रिक
फोडणीसाठी सुरुवातीला कढईत दोन चमचे तेल घाला. यानंतर मोहरी टाका. मोहरी चांगली तडतडली की त्यात मिरच्या टाका. मिरची थोडी भाजली की त्यात पाव चमचा हिंग घाला.यानंतर अर्धा कप पाणी घाला. यामध्ये 2 चमचे साखर घाला.चवीपुरते मीठ घाला.दोन चिमूट सायट्रिक अॅसिड घाला.याला मिक्स करून घेऊन उखळी आली की तीन ते चार मिनिट गॅसवर तसेच ठेवा.यानंतर गॅस बंद करून ही फोडणी गार करून घ्या.
ढोकळा बनवत असताना अशी घ्या काळजी
ढोकळा तयार करत करण्यासाठी मोठ्या कढईत पाणी घालून पाणी उकळायला ठेवा. यानंतर कुकरच्या डब्याला तेल लावून घ्या. कढईतील पाण्याला उकली आली की तयार पीठात 1 चमचा खायचा सोडा घाला. या सोड्यावर दोन चमचे पाणी घाला. यानंतर पीठ मिक्स करून घ्या. शक्यतो मिश्रण हाताने एकसारखे फेटून घ्या. आता हे मिश्रण तेल लावलेल्या डब्यात ओता. एक-दोन वेळा डबा डॅब करा. यानंतर उखळत्या पाण्यात हा डबा ठेवून झाकण ठेवा. यानंतर 15 ते 20 मिनिट मंद आचेवर हा ढोकळा चांगला शिजवून घ्या. आता सुरीने ढोकळा तयार झालाय का ते पाहा. यानंतर ढोकळा थंड होण्यासाठी ठेवा. ढोकळा थंड झाला की त्याचे काफ करा आणि त्यावर फोडणी घाला. झाला तयार खमंग खुसखुशीत ढोकळा.
टीप-ढोकळा तयार करत असताना सोडा खूप जुना वापरू नका यामुळे देखील ढोकळा स्पंजी होत नाही. याच बरोबर पाणी उखळल्यानंतरच पीठात खायचा सोडा घालून पीठ फेटून घ्या.









