स्पर्धेत गोवा, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली येथील संघ सहभागी होणार
गडहिंग्लज : गडहिंग्लजला दिवाळी सुट्टीत २४–३० ऑक्टोंबर अखेर होणाऱ्या निमत्रितांच्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेची तयारी गतीने सुरु आहे. गेल्या चार दिवसापासून फुटबॉलपटू श्रमदानातून एमआर हायस्कूल मैदानावरील गवत काढण्यासह माती टाकून दुरूस्ती करत आहेत. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत होणाऱ्या स्पर्धेचेयंदाचे विसावे वर्ष आहे. गडहिंग्लजला दिवाळीतील फुटबॉल स्पर्धांची अर्धदशकाची परंपरा आहे.
यंदाच्या स्पर्धेला दिल्लीचे अखिल भारतीय फुटबॉल महासंघ, मुंबईचे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने परवानगी दिली आहे. स्पर्धेसाठी मैदानाची तयारी गतीने सुरु आहे. खेळाडूनी श्रमदानातून मैदानावरील गवताची कापणी पूर्ण केली आहे.
मैदानाबाहेरील गवताची कापणी सध्या सुरु आहे. यावर्षीच्या अधिकच्या पाऊसामुळे मैदानावरील माती जास्त वाहून गेल्याने पडलेले खड्डे भर टाकून भरून घेतले जात आहेत. स्पर्धेसाठी लोकवर्गणीतून निधीचे संकलनही सुरू आहे. स्पर्धेत गोवा, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली येथील संघ सहभागी होणार आहे.
स्पर्धेसाठी एकूण अडीच लाख रुपयांची पारितोषिके आहेत. सहभागी संघाची प्रवास खर्च आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे. युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी, उपाध्यक्ष सतीश पाटील, समन्वयक सुभाष पाटील, ओंकार जाधव यांच्यासह संचालक, खेळाडू स्पर्धेची तयारी करीत आहेत.
गडहिंग्लजला दिवाळी सुट्टीत २४–३० ऑक्टोंबर अखेर होणाऱ्या निमत्रितांच्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेची तयारी गतीने सुरु आहे. गेल्या चार दिवसापासून फुटबॉलपटू श्रमदानातून एमआर हायस्कूल मैदानावरील गवत काढण्यासह माती टाकून दुरूस्ती करत आहेत. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत होणाऱ्या स्पर्धेचेयंदाचे विसावे वर्ष आहे. गडहिंग्लजला दिवाळीतील फुटबॉल स्पर्धांची अर्धदशकाची परंपरा आहे.