आकाश पाळणे तसेच शुभेच्छा फलक उभारणीसाठी धावपळ
प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकऱ्यांची देवी म्हणून बेळगाव परिसरात प्रचलित असलेल्या मंगाई देवीची यात्रा मंगळवार दि. 22 रोजी होणार आहे. बेळगाव शहरातील ही सर्वात मोठी यात्रा असल्यामुळे यात्रेच्या तयारीसाठी वेग आला आहे. आकाश पाळणे, विविध खेळ तसेच स्टॉल उभारणीचे काम सुरू आहे. त्याचबरोबर शुभेच्छा फलक लावण्यासाठी युवावर्गाची धडपड दिसून येत आहे.
मंगाई देवीची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मंगळवारी यात्रा होणार असल्याने यात्रेची जय्यत तयारी केली जात आहे. दुकानांमध्ये होणारी गर्दी पाहता दुकानांसमोर मंडप घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर मंदिर परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात येत आहे. मंदिर मार्गावर विद्युतमाळा लावल्या जात आहेत. एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून आतापासूनच नियोजन केले जात आहे.
यात्रेनिमित्त येळ्ळूर क्रॉसपासून महत्त्वाच्या सर्व मार्गांवर शुभेच्छा फलक लावण्यात येत आहेत. त्याचबरोबर गृहोपयोगी वस्तू व खेळण्यांचे स्टॉल उभारण्यासाठी कामगारांची धावपळ सुरू आहे. चांगल्या जागी खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारता यावेत, यासाठी काही जणांनी अॅडव्हान्स बुकिंग करून ठेवले होते. आकाश पाळणे दाखल झाले असून त्यांच्याकडूनही मागील दोन दिवसांपासून उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे.
यात्रेपूर्वी रस्त्यांची डागडुजी करा
यात्रा दोन दिवसांवर आली तरी वडगावच्या प्रमुख मार्गांवर अनेक ठिकाणी ख•s आहेत. जलवाहिन्या तसेच विविध प्रकारचे दुरुस्तीचे काम करताना करण्यात आलेल्या खोदाईमुळे ठिकठिकाणी ख•s पडले आहेत. महापालिकेने ख•dयांची तात्पुरती डागडुजी करण्याची मागणी वडगावच्या नागरिकांकडून केली जात आहे.









