2014 मध्ये प्रदर्शित कंगना रनौतचा चित्रपट ‘क्वीन’ हा तिच्या कारकीर्दीसाठी गेमचेंजर ठरला होता. या चित्रपटानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. आता या चित्रपटाचा सीक्वेल येणार आहे. दिग्दर्शक विकास बहल ‘क्वीन 2’ या चित्रपटावर काम करत आहे. आता कंगनाने देखील यावर शिक्कामोर्तब पेले आहे.
‘क्वीन 2’ या चित्रपटात कंगना रनौतच मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘क्वीन 2’ या चित्रपटाबद्दल लवकरच घोषणा करणार आहे. ‘क्वीन 2’ या चित्रपटासाठी अन्य कुठल्याही अभिनेत्रीबद्दल विचार करू शकत नाही. हा चित्रपट केवळ कंगना रनौत सोबतच तयार करण्यात येणार असल्याचे दिग्दर्शक विकास बहलने सांगितले आहे.
विकास बहलकडून घोषणा करण्यात आल्यावर कंगनाने ‘क्वीन 2’ च्या निर्मितीची पुष्टी दिली आहे. अभिनेत्रीने ‘क्वीन 2’ शी संबंधित वृत्त सोशल मीडियावर शेअर केले आहे. लवकरच हा चित्रटप प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यावर काम सुरू असल्याचे कंगनाने म्हटले आहे. क्वीन चित्रपटातील भूमिकेसाठी कंगनाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. यात राष्ट्रीय पुरस्काराचा समावेश होता.









