पणजी :
22 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर यादरम्यान पर्तगाळ मठाच्या 550 वर्ष पूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गोव्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नव्याने प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून वीरदेव विठ्ठलाच्या बाजूला असलेल्या श्रीरामाच्या मूर्ती या मंदिराबाहेर नेल्या होत्या त्या काल पुन्हा मंदिरात आणल्या. त्याचबरोबर श्री मंदिराचा सुवर्णकलश बसविण्याच्या तयारीलाही प्रारंभ झाला आहे.









