बेळगाव: सुवर्णसौध येथे डिसेंबर १९ ते ३० च्या दरम्यान हिवाळी अधिवेशन होत असून याची पूर्वतयारीची आज विधान सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी पाहणी केली.
सोमवारी बेळगावात हिवाळी अधिवेशन अधिकाऱ्यांची पूर्वबैठक घेऊन ते बोलत होते. राहण्याची, जेवणाची आणि परिवहन व्यवस्था योग्यरीत्या उपलब्ध केल्यास हे अधिवेशन यशस्वी होईल असे सांगताना, कोणत्याही समस्या निर्माण होऊ नयेत याची दखल घेतली जावी असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिवेशन पूर्व तयारीची माहिती दिली.
यावेळी पोलीस कमिश्नर एमबी बोरलिंगय्या, विधानसभेचे सचिव विशालाक्षी , जिल्हा पंचायत मुख्यकार्यकारी अधिकारी दर्शन एसव्ही, जिल्हा पोलीस वरिष्ठ अधिकारी डॉ. संजीव पाटील व इतर उपस्थित होते.









