वृत्तसंस्था/कोलकाता
भारतात जीवन विमासंबंधीत नव्याने प्रिमीयम व्यवसायामध्ये 13 टक्के इतकी वाढ मे मध्ये झाली आहे. मे महिन्यामध्ये जवळपास 30 हजार 463 कोटी रुपयांचा जीवन विमा कंपन्यांचा व्यवसाय झाला आहे. वर्षाआधी मे महिन्यामध्ये पाहता 27 हजार 34 कोटी रुपयांचा व्यवसाय प्राप्त करता आला होता. आर्थिक वर्षाच्या दोन महिन्यांमध्ये मेअखेर प्रीमियम व्यवसाय 10 टक्के वाढून 52 हजार 427 कोटी रुपयांचा झाला आहे. जीवन विमा परिषदेने यासंदर्भातली माहिती दिली आहे. यामध्ये पाहता एलआयसीने नव्या व्यवसाय प्रीमियमच्या माध्यमातून 10 टक्के वाढीसह 18405 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. एप्रिल, मे महिन्यात एकंदर 32 हजार 15 कोटी रुपयांचा व्यवसाय प्रिमीयमच्या माध्यमातून केला आहे.









