रत्नागिरी :
शहरातील खासगी रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिला पोलीस अंमलदाराचा आकस्मिक मृत्यू झाल़ा ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडल़ी सांची सुदेश सावंत (38, ऱा आरोग्य मंदिर, रत्नागिरी) असे या महिला पोलिसाचे नाव आह़े सहकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूची खबर मिळताच पोलीस अंमलदार, अधिकाऱ्यांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली आह़े
सांची ही 9 महिन्यांची गरोदर असल्याने ती प्रसुतीसाठी शहरातील खासगी ऊग्णालयात दाखल झाली होत़ी 25 जुलै रोजी दुपारी सांची हिला अचानक चक्कर आल़ी यामध्ये ती बेशुद्ध पडल्याने तिला उपचारासाठी अन्य एका खासगी ऊग्णालयात दाखल करण्यात आल़े येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. सांची ही प्रेमळ स्वभावाची म्हणून पोलीस खात्यात तिची ओळख होत़ी प्रसुतीच्या तारखेपर्यंत ती नियमित कामावर येत असल्याचे तिच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सांची हिचे पती सुदेश सावंत हे देखील पोलीस खात्यामध्ये कार्यरत असून त्यांना दोन मुली आहेत़








