वैज्ञानिकांनी केला चमत्कार
गर्भाशयाबाहेर भ्रूण तयार करणे अशक्य मानले जाते, परंतु हे सत्यात उतरविण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. वैज्ञानिकांकडून विकसित या तंत्रज्ञानाला कृत्रिम गर्भाशय म्हटले जाते, हे कृत्रिम गर्भाशय गर्भधारणेपासून जन्माची प्रक्रिया कुठल्याही गर्भावस्थेशिवाय पूर्ण करू शकते. कृत्रिम गर्भाशय महिलांच्या गर्भाशयाच्या सर्व कार्यांना पार पाडण्यास सक्षम आहे. हा विकासशील भ्रूणाला ऑक्सिजन आणि पोषक घटक प्रदान करतो. सध्या एका प्राण्याच्या पिल्लांना सपोर्ट करण्यासाठी एक प्रयोगात्मक कृत्रिम गर्भाशयाचे परीक्षण केले जात आहे.
कृत्रिम गर्भाशयाचा मुख्य वापर वेळेपूर्वी जन्मणाऱ्या मुलांना सपोर्ट करणे आहे. कृत्रिम गर्भाशयात ठेवण्यात आलेल्या प्रामॅच्योर बेबी जिवंत राहण्यासोबत त्यांचे वजन वाढले आणि केसही उगवल्याचे प्रयोगात दिसून आले आहे. बहुतांश लोक या तंत्रज्ञानाबद्दल साशंक असले तरीही नव्या पिढीने याचे खुल्या मनाने स्वागत केले आहे.
एका सर्वेक्षणानुसार 18-24 वयोगटातील 42 टक्के युवांनी ‘भ्रूणाला महिलेच्या शरीराबाहेर विकसित करण्याच्या’ बाजूने असल्याचे म्हटले आहे. हे सर्वेक्षण थिंक टँक थियोसने केले होते. बहुतांश लोक या तंत्रज्ञानाच्या विरोधात आहेत, केवळ आई किंवा अपत्याचा जीव वाचविण्यासाठी याचा वापर व्हावा असे लोकांचे सांगणे आहे.
तर हे तंत्रज्ञान महिलांसाठी क्रांतिकारक ठरू शकते असे काही लोकांचे मानणे आहे. गर्भावस्थेत शारीरिक आणि भावनात्मक भारापासून महिलांना यामुळे मुक्ती मिळू शकते असे त्यांचे सांगणे आहे. तर काही टीकाकारांनुसार हे तंत्रज्ञान महिलांच्या अस्तित्वासाठी धोका’ ठरू शकते.
एका सामान्य गर्भावस्थेत भ्रूण 37-40 आठवड्यांपर्यंत आईच्या गर्भात विकसित होतो. यादरम्यान भ्रूणाची फुफ्फुसं एमिनयोटिक द्रवाने भरलेली असतात आणि त्याला ऑक्सिजन आणि पोषक घटक आईच्या प्लेसेंटाद्वारे प्राप्त होतात. कृत्रिम गर्भाशयाचा उद्देश या सर्व प्रक्रियांना तांत्रिक पद्धतीने पुन्हा करणे आहे. जेथे भ्रूणाला एका बॅगेत ठेवले जाईल आणि त्याला कृत्रिम प्लेसेंटाद्वारे पोषक घटक पुरविले जातील. या प्रक्रियेला ‘एक्टोजेनसिस’ म्हटले जाते, ज्याचा अर्थ शरीराबाहेर एखाद्या जीवाचा विकास असा होतो.
सध्या हे तंत्रज्ञान शक्य नसले तरीही भविष्यात ते आईच्या गर्भाशयाची जागा घेऊ शकते. कृत्रिम गर्भाशयाचा मुख्य उद्देश प्रीमॅच्योर बेबींचा जीव वाचविणे आहे. फिलाडेल्फियाच्या मुलांच्या रुग्णालयात संशोधकांनी प्राण्यांवर या तंत्रज्ञानाचे यशस्वी परीक्षण केले आहे. हे तंत्रज्ञान प्रीमॅच्योर बेबींचा जीव वाचवू शकते तसेच मातेसाठी जोखिम करू शकते असे संशोधकांचे सांगणे आहे.









