तापमान वाढीचा परिणाम, वाढत्या उष्म्यांने नागरिक हैराण
बेळगाव : दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत शरीराला थंडावा देणाऱ्या माठांना पसंती मिळू लागली आहे. गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणाऱ्या माठांची विक्री होऊ लागली आहे. बाजारात विविध आकारांमध्ये आकर्षक माठ दाखल झाले आहेत. उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यामुळे शरीराची लाहीलाही होत आहे. अशा परिस्थितीत तहान भागविण्यासाठी माठांची खरेदी केली जात आहे. विशेषत: यामध्ये माठ, बॉटल, जग्ग, नळ नसलेले माठ उपलब्ध आहेत. सामान्य नागरिकांबरोबर लग्नकार्य आणि यात्रेसाठीही नागरिकांकडून माठांची खरेदी होत आहे.
कार्यालयातही माठांची खरेदी
थंड पेयांबरोबर पाणी थंडगार राहण्यासाठी सर्वसामान्याबरोबर कार्यालयातही माठांची खरेदी केली जात आहे. वळिवाचा पाऊस झाला असला तरी, उष्मा कायम आहे. अलीकडे विविध आकारांमध्ये आणि नागरिकांच्या मागणीनुसार आकर्षक माठही दाखल झाले आहेत.









