मुरगांव सार्वजनिक नवरात्रोत्सव सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजन
प्रतिनिधी /वास्को
मुरगांव सार्वजनिक नवरात्रोत्सव सांस्कृतिक मंडळ सडातर्फे आयोजित व युवक संघ ट्रस्ट सडातर्फे पुरस्कृत महिलांसाठी (बटाटय़ापासून गोड पदार्थ) स्पर्धेत प्रिती राणे यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.
या स्पर्धेचे दुसरे बक्षीस श्रेया शेटय़े तर तिसरे बक्षीस बबीता पालेकर यांना प्राप्त झाले. उत्तेजनार्थ पहिली तीन बक्षिसे अनुक्रमे गंगा पेडणेकर, सुमित्रा होन्नावरकर व सेजल नाईक यांना देण्यात आली. परीक्षक म्हणून मानसी मिलिंद देसाई (आहारतज्ञ) व अपेक्षा अभय फळदेसाई (लॅब सहाय्यक) यांनी काम पाहिले. एकूण 21 महिलांनी या स्पर्धेत भाग घेऊन बटाटय़ापासून विविध पदार्थ तयार केले होते.
बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून मुरगांवच्या नगरसेविका ऍड. कुणाली पार्सेकर उपस्थित होत्या. व्यासपीठावर युवक संघ ट्रस्टचे अध्यक्ष रमाकांत कुडपकर, ट्रस्टचे सचिव तथा मंडळाचे अध्यक्ष दिलीप शेर्लेकर, विश्वस्त प्रेमनाथ आरोंदेकर, प्रविण बांदेकर व संदेश सातार्डेकर तसेच नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक तोरस्कर (शेटय़े), उपाध्यक्ष राजू पेडणेकर, संजय तोरस्कर, गोकुळदास घाटवळ व परीक्षक उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्याहस्ते विजेत्यांना रोख बक्षिसे व चषक देण्यात आले. प्रमुख पाहुण्या ऍड. पार्सेकर यांचे यावेळी भाषण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टचे विश्वस्त गिरीष कोळमकर यांनी केले तर विश्वस्त सुरज घोणसेकर यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यास सीमा परब हिने मेहनत घेतली.