मिश्रा यांनी कुलेम रेल्वेस्थानकाची केली पाहणी
प्रतिनिधी /बेळगाव
घाट परिसरात मागील काही वर्षांत रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेकडून मान्सूनपूर्व दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. या कामाचा आढावा अतिरिक्त सरव्यवस्थापक पी. के. मिश्रा यांनी कुलेम रेल्वेस्थानकाला भेट देऊन घेतला.
लोंढा ते वास्को यादरम्यान घाट परिसर आहे. मागीलवषी दूधसागरनजीक दरड कोसळून निजामुद्दीन एक्स्प्रेसला अपघात झाला होता. यामुळे दोन दिवस या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी मालवाहू डब्याला अपघात झाला. अशा घटना वारंवार होत असून त्या टाळण्यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेकडून उपाययोजना केल्या जात आहेत.
उपाययोजना करणे गरजेचे
गोवा येथील कुलेम रेल्वेस्थानकाला भेट देऊन पी. के. मिश्रा यांनी आढावा घेतला. घाटात अनेक धोकादायक ठिकाणे असून दरड कोसळण्याची शक्मयता आहे. पावसाळय़ात या भागात जोरदार पाऊस होत असल्याने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. धोकादायक वृक्षांचीही समस्या येत असल्याने नैर्त्रुत्य रेल्वेकडून मान्सूनपूर्व काळात सुरक्षा नियोजन करण्यात येत आहे.









