पणजी/ प्रतिनिधी
राज्यात आजपासून पुढील तीन दिवस विजांच्या गडगडाटासह मध्यम प्रमाणात पावसाची शक्मयता व्यक्त केली असून पणजी वेधशाळेने याकरिता एलो अलर्ट जाहीर केला आहे. पणजी वेधशाळेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज 31 मे, एक आणि दोन जून अशा तीन दिवसात राज्यात सर्वत्र गडगडाटासह पावसाची शक्मयता आहे. मान्सून अद्याप गोव्यापर्यंत सरकलेला नाही, तो केरळमध्ये पोहोचला आणि नंतर तो तिथेच कुठेतरी अडकून बसलेला आहे.









