चिपळूण :
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही तालुक्यात पाणीटंचाई उद्भवली असून या टंचाईग्रस्तांना एका खासगी टँकरव्दारे पाणी पुरवठा केला गेला. असे असतानाच सततच्या कोसळणाऱ्या मान्सूनपूर्व पावसामुळे ग्रामीण भागातील नैसर्गिक जलस्रोत भरल्याने गेल्या ४ दिवसापासून टंचाईग्रस्तांची तहान भागवण्यासाठी टैंकर धावलेला नाही. तसे पाहिल्यास या पावसामुळे मान्सूनपूर्व कामाचा बट्ट्याबोळ उडाला असला तरी तरी टंचाईग्रस्तांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात मुबलक पाऊस असताना तालुका अद्यापही टैंकरमुक्त झालेला नाही. दरवर्षी फेब्रुवारी, मार्च महिना उजाडताच पाणीटंचाई उद्भवणाऱ्या संबंधित गावातून प्रशासनाने टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा, यासाठीचे अर्ज दाखल होत असतात. यंदाही तालुक्यात पाणीटंचाई समस्या उद्भवली असून डोंगर, दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या धनगरवाड्यामधून प्रशासनाकडे टैंकरव्दारे पाणीपुरवठा करावा, यासाठीचा पहिला अर्ज दाखल झाला होता. पंचायत समितीकडे टंचाईग्रस्तांसाठी स्वमालकीचा टँकर नसल्याने दोनऐवजी एक खासगी टैंकर अधिग्रहित करून सर्वेक्षणाअंती अडरे, कोंढमळा, सावर्डे, कुडप, अनारी, कादवड, टेरव या गावातील धनगरवाड्यांना पहिल्यांदा टैंकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आला जसजसा वातावरणात कडाक्याचा उष्मा वाढू लागला तसतशी टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होत होती. प्रशासनानेही तालुक्याचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा करतेवेळी ५२ गावे आणि २४७ वाड्यांच्या टंचाई निवारणासाठी १ कोटी ३४ लाखाचा अपेक्षित खर्च नमूद केला आहे. टंचाईग्रस्तांची तहान भागवताना एका टँकरवर मोठा ताण येत असतानाही अशा स्थितीतही आतापर्यंत तालुक्यातील ९ गावांमधील तेरा वाड्यांमध्ये टैंकरने पाणीपुरवठा केला गेला. वातावरणातील वाढता उष्मा लक्षात घेता तालुक्यात मीषण पाणीटंचाई निर्माण होतेय की काय, अशी चिन्हे निर्माण झाली असतानाच अशातच काही दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. सुरुवातीला हलक्या स्वरुपात कोसळणारा पाऊस पुढे धुवाँधार झाल्याने यामुळे नदी, नाले काही प्रमाणात तुडूब मरुन वाहू लागले. सततच्या कोसळणाऱ्या या पावसामुळे ग्रामीण भागातील नैसर्गिक जलस्रोतही भरले गेले. अशा स्थितीत टंचाईग्रस्तांची तहान हे नैसर्गिक जलस्रोत भागवू लागल्याने अखेर टंचाईग्रस्तांसाठी धावणारा टैंकर अखेर बंद झाला. तालुक्यात २१ मे रोजी तालुक्यात कुडप ठिकाणी टंचाईग्रस्तांची तहान भागविण्यासाठी गेला होता. तसे पाहिल्यास या पावसामुळे अनेकांचा मान्सूनपूर्वच्या कामाचा बट्ट्याबोळ उडाला असला तरी दुसरीकडे या पावसाने पाणी टंचाईग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.








