अर्थसंकल्प 2024 च्या तयारीस होणार सुरुवात
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी वित्त मंत्रालय 10 ऑक्टोबरपासून बैठकांची मालिका सुरू करणार आहे. वित्त मंत्रालयाने जारी केलेली सूचना वित्त मंत्रालयाच्या अर्थसंकल्प विभागाद्वारे जारी केलेल्या सूचनेनुसार, अनुदान/विनियोजन संदर्भात सुधारित अंदाज 2023-24 आणि अंदाजपत्रक 2024-25 ला अंतिम रूप देण्यासाठी वित्त सचिव आणि सचिव (खर्च) यांच्यात पूर्व-अर्थसंकल्पीय चर्चेला 10 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. 20 सप्टेंबर 2023 रोजी सर्व मंत्रालये आणि विभागांना पाठवलेल्या या नोटिसमध्ये त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांचा उल्लेख आहे. विविध गरजा लक्षात घेऊन अर्थसंकल्पपूर्व बैठकांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. नोटीसनुसार, मंत्रालये आणि विभागांनी 5 ऑक्टोबर 2023 पर्यंत आवश्यक रिटर्न्स सादर केल्याची खात्री करावी. नियोजित वेळापत्रकानुसार, पूर्व-अर्थसंकल्पीय बैठका 10 ऑक्टोबरपासून सुरू होतील आणि 14 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहतील. 2024-25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सार्वत्रिक निवडणुकांनंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सादर केला जाईल.









