48 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह अन्य सुविधा उपलब्ध : 22 सप्टेंबरपासून स्टोअरमध्ये होणार उपलब्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयफोन 15 मालिकेचे प्री बुकिंग करण्यास 15 सप्टेंबरपासून सायंकाळी 5.30 वाजता सुरुवात झाली आहे. या स्मार्टफोनची मालिका 22 सप्टेंबरपासून अॅपलच्या अधिकृत स्टोअर आणि वेबसाईटवर उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
कॅलिफोर्निया येथे टेक कंपनी अॅपलने मंगळवारी 12 सप्टेंबर रोजी आपल्या वंडरलस्ट या कार्यक्रमात 79,990 रुपयांच्या किंमतीसह आयफोन 15 चे सादरीकरण केले आहे. कंपनीने वॉच सीरीज 9 आणि वॉच अल्ट्रा 2 देखील सादर केले आहेत. अॅपलने प्रथमच चार्जिंगसाठी टाइप सी पोर्ट सादर केले आहे.
टायटॅनियमचा भाग
यावेळी आयफोन 15 मध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. आयफोन 15 आणि 15 प्लस मध्ये ए 16 बायोनिक चिप मिळणार आहे. त्याच दरम्यान आयफोन 15 प्रो आणि प्रो मॅक्सला ए 17 प्रो चिप मिळणार आहे. या प्रो मॉडेल्समध्ये टायटॅनियमचा वापर करण्यात आला आहे.
ऑईल इंडियाने 38 लाख टन तेल उत्पादनाचे ध्येय
नवी दिल्ली : ऑइल इंडियाने 38 लाख टन तेल उत्पादनाचे ध्येय निश्चत केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उर्जा उत्पादक ऑइल इंडिया लिमिटेड आसाम आणि राजस्थानमधील अनेक नवीन विहिरी आणि वायू क्षेत्रांमधून उत्पादनाची अपेक्षा करत आहे, त्यामुळे कंपनी चालू आर्थिक वर्षात 3.8 लाख टन कच्च्या तेलाचे उत्पादन करू शकणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीत रथ यांनी ही माहिती देताना म्हटले आहे की, नवीन ध्येय 2022-23 च्या उत्पादनापेक्षा 20 टक्क्यांनी जास्त आहे. आसाम ऑइल कंपनीला उत्पादन वाढीच्या करारांतर्गत तीन गॅस फील्ड कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
ऑइल इंडियाने 2040 पर्यंत शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी सुमारे 25,000 कोटी रुपये (3.38 अब्ज डॉलर) गुंतवण्याची योजना आखली आहे. कंपनी 2जी इथेनॉल सेगमेंटमध्ये 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.









