ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Pre-arrest bail granted to Raj Kundra बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. राज कुंद्रासह अन्य चार आरोपींनाही या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. त्यामध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांचाही समावेश आहे.
राज कुंद्रासह त्याच्या अन्य चार सहकाऱ्यांवर अश्लील व्हिडीओ शूट करुन ते डिस्ट्रीब्यूट केल्याचा आरोप आहे. यापूर्वीच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपी तपासात सहकार्य करत होते. त्यामुळे राज कुंद्राला न्यायालयाने अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते.
अधिक वाचा : देवेंद्रजी, हे वाचाळवीर भाजपला बुडविल्याशिवाय राहणार नाहीत
राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक झाली होती. एका महिलेने त्यांच्यावर शूटच्या नावाखाली अश्लिल व्हिडिओ शूट करुन ते डिस्ट्रीब्यूट केल्याचा आरोप केला होता. भारतीय दंड संहिता कलम 420, 292 आणि 293 (अश्लीलता आणि अश्लील जाहिराती आणि प्रदर्शनांशी संबंधित) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शार्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांना सहआरोपी करण्यात आले आहे.








