शहर देवस्थान मंडळ-कंग्राळ गल्ली भाविकांचा पारंपरिक रिवाज
बेळगाव : शहर देवस्थान मंडळाच्यावतीने सोमवारी हनुमाननगर येथील श्री धुपटेश्वर गौळदेवाला गाऱ्हाणे घालण्यात आले. शहर देवस्थान मंडळाचे रणजित चव्हाण-पाटील यांनी गाऱ्हाणे घातले. कंग्राळ गल्ली पंच मंडळाच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर वाणी जोशी व नगरसेवक शंकर पाटील उपस्थित होते. याप्रसंगी बैलावर भाताचे गोळे मारून ‘चांगला पाऊस होऊ दे, ‘पीक पाणी उदंड येऊ दे’, अशी प्रार्थना यावेळी भक्तांनी गौळदेवाकडे केली. यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, बाबुराव कुट्रे, शंकर बडवाण्णाचे, अशोक कंग्राळकर, विठ्ठल पाटील, सागर मुतगेकर, मारुती गवसेकर, सचिन चौगुले, दुर्गेश मेत्री यासह कंग्राळ गल्लीतील नागरिक व देवस्थान मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.









