ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुंबई: राज्यसभेभेच्या ६ व्या उमेदवारीतून छत्रपती संभाजीराजे यांनी माघार घेताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे. दरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्य़मंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. उमेदवारी संदर्भात मुख्यमंत्र्यांचाच दबाव होता असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
महाराष्ट्रात दबाव टाकणारे दोन नेते
अपक्ष उमेदवारांचा मला पाठिंबा होता. मात्र त्यांच्यावर दबाव होता असे संभाजीराजे (Sambhajiraje) पत्रकार परिषदेत म्हणाले. यावर प्रवीण दरेकर म्हणाले, महाराष्ट्रात सध्या सत्तेतील दोनच व्यक्ती आहेत ज्या दबाव टाकू शकता. एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब (Shara Pawar) आणि दुसरी व्यक्ती म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब.मला वाटते हे सर्व ठरवून करण्यात आले आहे. सुरुवातीला शरद पवार यांनी पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे म्हणाले आमचा उमेदवार असणार. यानंतर शरद पवार म्हणाले शिवसेनेच्या उमेदवारांना आम्ही मत देणार. नेमकी यांची काय भूमिका होती असा सवाल दरेकर यांनी केला.
ब्रेकिंग-स्वराज्य बांधण्यासाठी मी तयार झालोय, स्वाभिमानी आहेच म्हणून माघार- संभाजीराजेंचे स्पष्टीकरण https://tarunbharat.com/shahaji-raje-press-conference-in-mumbai-rajya-sabha-update-marathi-tbt-news/
भाजपाने कधीच दबाब टाकला नाही
सेनेवर टीका करताना दरेकर म्हणाले, संभाजीराजे यांना उमेदवारी द्यायची होती की त्यांचा अपमान करायचा होता. याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला द्यावे लागणार. छत्रपती संभाजी राजेंच्या बाबतीत जे झालं ते महाराष्ट्राला शोभा देणार नाही. संभाजीराजेंना अटी-चौकटीत बांधणे योग्य नव्हतं.भारतीय जनता पार्टीने राष्ट्रपतीच्या कोट्यातून ज्यावेळी उमेदवारी दिली. त्यावेळेस त्यांना कोणत्याही अटी-नियम न लावता मोकळीक देण्यात आली होती. त्यांनी केंद्र सरकारवर,देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तरीही त्यांना कायद्याच्या किंवा पक्षाच्या धोरणात बांधून ठेवण्यात आलं नव्हतं असेही ते म्हणाले.