सावंतवाडी प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष , खासदार शरद पवार यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले यांनी सदीछा भेट घेऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीमध्ये लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका ,सहकार, ग्रामपंचायत निवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेळ पडल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली पाहिजे, त्याच बरोबर कार्यकर्त्यांनी महविकास आघाडीचे अस्तित्व महाराष्ट्रात आहे व पुढेही राहणार आहे याचेही भान सर्व स्तरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी ठेवले पाहिजे ,अशाही सूचना राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार यांनी या चर्चेच्या माध्यमातून दिल्याचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सांगितले .









